बँकेकडून ग्राहकांना मिळते अपमानास्पद वागणूक

0

भुसावळ (प्रतिनिधी) –येथील युनियन बँकेत ग्राहकांशी अरेरावीची वर्तणूक करण्यात येत असल्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. काही ग्राहकांनी आपल्या खात्याबद्दल माहिती मागितली असता त्यांनादेखील सुरक्षा रक्षकांद्वारे बाहेर काढण्यात आले. प्रमिला राजोरेकर यांच्या मावस भावाचे युनियन बँकेत खाते आहे. मात्र सदर खातेधारक अपंग असल्याने बँकेत येवू शकत नाही. प्रमिला राजोरेकर या बँकेत खात्याबद्दल विचारपूस करण्यास गेले असता त्यांना शाखा व्यवस्थापक एस.ए. भोळे यांनी अपमानास्पद वागणूक देवून सुरक्षा रक्षकाद्वारे बाहेर काढले. तसेच राजोरेकर यांनी माहितीच्या अधिकाराचा अर्ज केेला असून त्यांनी वकिलाच्या माध्यमातून माहिती मागितली असता तरीदेखील दिली जात नसल्याचे त्यांचे वकील मेणे यांचे म्हणणे आहे.