यवत । बँकांतील सर्व व्यवहार हे मराठी भाषेत असले पाहिजे, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले होते. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार प्रत्येक राज्यात बँकांतील व्यवहार हे त्या राज्यातील स्थानिक भाषेत असावेत असे निर्देश आहेत. परंतु रिझर्व्ह बँकेचे सर्व नियम धाब्यावर बसवत हे सर्व व्यवहार सध्या हिंदी व इंग्रजी भाषेत होत आहेत. महाराष्ट्राची राजभाषा मराठी असून व्यवहार मात्र दुसर्या भाषेत चालतात. बँकेचे व्यवहार मराठीत चालावे या मागणीसाठी मनसेतर्फे बँकांना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रीयकृत बँकांतील सर्व व्यवहार मराठी भाषेत व्हावे यासाठी दौंड तालुका मनसेच्या पदाधिकार्यांनी दौंडमधील सेंट्रल बँक ऑफ इंडिया, भारतीय स्टेट बँक, कॅनरा बँक, आयडीबीआय, आयसीआय बँक, एचडीएफसी बँक, महाराष्ट्र बँक, अँक्सिस बँक आदी बँकांना निवेदने दिले. यावेळी मनसेचे सागर पाटसकर, सचिन कुलथे, प्रतिभा डेंगळे, किसन मोरे, संतोष सोनवणे, राजु चातू, लता बगाडे, पप्पू यादव, आकाश पुजारी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.