नवी दिल्ली – गार्डने ग्राहकावर गोळी झाडल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीमध्ये विजया बँकेच्या एका शाखेत बँकेच्या गार्डने ग्राहकावर गोळी झाडली. गोळी झाडण्याचे कारण अजून समोर आले नाही. माहितीनुसार पीडित व्यक्ती आणि बँकेतील वरिष्ठ कर्मचाऱ्यामध्ये वाद झाल्यामुळे गार्डने त्याच्यावर गोळी झाडल्याचे म्हटले जात आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी जखमी अवस्थेत पीडित व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले. त्याची परिस्थिती सध्या गंभीर आहे. घटनास्थळावरून बँकेच्या गार्डला अटक केलेली आहे. तसेच त्याच्याजवळून बंदूक आणि ४ जिवंत काडतूस जप्त केले आहेत. या घटनेची चौकशी दिल्ली पोलीस करत आहेत