मुंबई : नागरिकांची तसेच विविध क्षेत्रांची अर्थिकस्थिती मंदावलेली असताना आता सरकारने अनेक बँक सेवा सशुल्क केल्या आहेत. ऑनलाईन बँकींगला चालणा देण्याचा गाजावाजा सुरू असताना या सेवाही महागणार आहेत. बँकांमध्ये 20 जानेवारीपासून नियम बदलले जाणार असून पैसे जमा करण्यासाठीही शुल्क भरावे लागणार आहे. चेकद्वारे पैसे काढण्यासही शुल्क लागेल. अशाच प्रकारच्या 7 सेवा ज्या मोफत होत्या त्यांच्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे.
बँक खात्यातून कापणार शुल्क
ग्राकहकाला शुल्क लागू झाल्यास त्याचे पैसे थेट बँक खात्यातून कापले जाणार आहेत. देशभरातील बँक ग्राहकांवर त्याचा परिणाम होईल. बँक ग्राहक आधीच अनेक प्रकारचे शुल्क भरत आहेत. त्यात किमान शिल्लक नसल्यापासून ते एटीएममधून पैसे काढण्यासाठी लागणार्या शुल्कांचा समावेश आहे. त्यामुळे यापुढे सुद्धा ग्राहकांच्या खिशावर मोठा भार पडणार आहे. सरकाच्या कृपेने बँका आता ग्राहाकांच्या खिशावर चांगलाच डल्ला मारणार आहेत.
या सेवांसाठी शुल्क लागू
* पैसे काढण्यासाठी
* पिन, पासवर्डसाठी 10 रूपये
* सेल्फ चेकने कमला 50 हजार काढता येणार, अधिक काढल्यास 10 रूपये अधिक शुल्क
* तिसर्या व्यक्तीला चेकने केवळ 10 हजार काढता येतील.
* बचत खात्यात रोज केवळ 2 लाख जमा करता येतील, पन्नास हजारावर शुल्क नसेल पण पुढील प्रत्येक 50 हजारासाठी 2.5 रूपये शुल्क
* सीए, सीसी आणि ओडी खात्यात रोज 25 हजार जमा करता येतील. त्यानंतर प्रत्येक हजार रूपयांना 2.5 रूपये शुल्क