बँकेतूनच आरोपींना व्हॉटस्अ‍ॅपवरुन पाठविली ग्राहकांच्या खात्यांची माहिती

0

सायबर क्राईमच्या तपासात निष्पन्न ; दिल्ली येथील फसवणुकीतील चौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

जळगाव- येथील सायबर पोलिसांनी दिल्ली येथील कॉल सेंटरच्या माध्यमातून फसवणूक करणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला असून त्यात चार जणांना अटक केली आहे. या चौघांची शनिवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. दरम्यान बॅकेतूनच ग्राहकांच्या खाते क्रमांकासह इतर माहितीचा डाटा आरोपींना पुरविण्यात आल्याचे तपासात समोर आले असून कॉम्प्युटर स्क्रीनचा फोटा काढून व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून आरोपीपर्यंत माहिती पोहचविणारा ? त्याचा पोलीस शोध घेत आहे.

चांदवड येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत डॉ. अजय ओंकारनाथ दहाड यांना एटीएमकार्डचे पैसे करत असल्याचा बहाणा करुन भामट्याने 1 लाख 66 हजार 800 रुपयांचा गंडा घातला होता. या गुन्ह्यात सायबर पोलिसांनी तपासचक्रे फिरवित दिल्ली येथील कॉल सेंटरचा पर्दाफाश केला होता. तसेच मास्टरमाईंड भुपेंदर सिंग कुमार मुकेश कुमार (वय 20 रा, ईश्‍वर कॉलनी सह अर्जून पार्क, नजबगढ, नवी दिल्ली), अमन लांबा बालकिशन लांबा (वय 21, उत्तमनगनर, नवी दिल्ली), राहूल कौशिक सुरेश कुमार (वय 21 उत्तमनगर नवी दिल्ली, व नितीन राकेश टंडन (वय 24 रा. उत्तम नगर नवी दिल्ली) या चौघांना अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केल्यावर 20 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्याने शनिवारी न्यायलयात हजर केले असा, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

इतरांनाही क्रेडीट कार्डव्दारे सव्वा लाखात गंडा
अटकेतील संशयितांकडे तीन स्टेट बॅकेची क्रेडीत कार्ड मिळून आले आहे. या क्रेडीट कार्डव्दारे संशयितांनी एकूण 6 लाख 20 हजार 900 रुपयांचे मोबाईल व इतर मोबाईलचे साहित्य खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरचे क्रेडीट कार्ड कोणाच्या मालकीचे आहेत, ही माहिती स्टेट बँकेकडून प्राप्त करावयाची असून संबंधित मोबाईल व साहित्य संशयितांकडून हस्तगत करावाचे आहे. अशाप्रकारे संशयितांनी देशातील अनेक नागरिकांची फसवणुकीची शक्यताही सायबर पोलिसांनी व्यक्त केली आहे.

कोणत्या बॅँकेतून व कोणी पाठविली माहिती?
सायबर ठाण्याच्या पोलिसांनी केलेल्या तपासातआरोपींना कॉम्प्युटर स्क्रीनचे फोटो काढून बँकेच्या ग्राहकांच्या खातेक्रमांकाची तसेच इतर माहिती पुरविण्यात आली आहे. माहिती नेमकी कोणत्या बँकेतून व कोणी पुरविली? याचाही पोलीस शोध घेत असून तपासात धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता आहे.