जळगाव : बँकेकडे 12 लाखात गहाण ठेवलेली जागा परस्पर विक्री करून फसवणूक केल्याचा प्रकार उघकीला आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल
विठ्ठल काशिनाथ बावस्कर आणि त्यांची पत्नी सरला विठ्ठल बावस्कर दोन्ही (जामनेर, जि.जळगाव) यांची जळगाव शहरातील गट नंबर 487 असलेली 225 चौरस मीटर ही जागा ही 2016 मध्ये 12 लाखासाठी इक्विटस फायनान्स बँकेत तारण ठेवली होती. त्यानंतर विठ्ठल बावस्कर व त्यांची पत्नी यांनी 2019 ते 2020 दरम्यान गहाण ठेवलेली जागा ही परस्पर विकून टाकली. हा प्रकार इक्विटस फायनान्स बँकेच्या अधिकार्यांना कळाल्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन फसवणुकीची तक्रार दिली. बँक व्यवस्थापक गणेश भालचंद्र शेडूते यांच्या फिर्यादीवरून विठ्ठल काशिनाथ बावस्कर आणि त्यांची पत्नी सरला विठ्ठल बावस्कर यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.