सीबीआयची विशेष न्यायालयात माहिती
पीएनबी घोटाळा
मुंबई : पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) कोट्यवधींचा घोटाळा करून विदेशात पळून गेलेल्या नीरव मोदीने बँकेच्या अधिकार्यांना लाच स्वरुपात सोने आणि हिर्यांचे दागिने दिले होते, अशी माहिती सीबीआयने मुंबईतील विशेष न्यायालयात दिली. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्याने बँक अधिकार्यांना ही लाच दिली होती, असेही सीबीआयने म्हटले आहे.
यशवंत जोशीने घेतले सोने, हिर्याचे दागिने
पीएनबी महाघोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आतापर्यंत 14 जणांना अटक केली आहे. पीएनबीच्या ब्रॅडी हाऊस शाखेत 2015 ते 2018 या काळात फॉरेक्स विभागाचा व्यवस्थापक असलेल्या यशवंत जोशी याने लाच स्वरुपात दागिने घेतल्याची कबुली दिली आहे. त्याने दोन किलो सोन्याची नाणी, सोने आणि हिर्याचे झुमके घेतले. हे सर्व दागिने जोशीच्या घरातून हस्तगत करण्यात आले आहेत, अशी माहितीही सीबीआयने दिली. जोशीने नीरव मोदीच्या सांगण्यावरून बनावट लेटर ऑफ अंडरटेकिंग जारी केले होते. तसेच आणखी एक अधिकारी प्रफुल्ल सावंत याने बँकांच्या आर्थिक व्यवहारांसंबंधी संदेशांकडे दुर्लक्ष केले, अशी माहितीही सीबीआयने दिली.होते.