शिरपूर । राष्ट्रीयकृत बँकांमध्ये बँक ऑफ बडोदाची योग्य अशी वाटचाल सुरू असून ग्राहकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळेच बँकेच्या शिरपूर शाखेचे कार्यालय नविन जागेत स्थलांतर करण्यात आले असून सुसज्ज अशा इमारतीतून काम करतांना ग्राहकांना चांगल्या प्रकारे सुविधा देण्याकडे येथील कर्मचार्यांचे प्राधान्य असेल असे प्रतिपादन बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक व औरंगाबाद उपक्षेत्रिय प्रमुख आनंदराव वासे यांनी केले. बँक ऑफ बडोदाच्या शिरपूर शाखेचे नविन जागेत स्थलांतर उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
मर्चंट बँकेचे माजी चेअरमन व संचालक किरण दलाल, दर्शन टायरचे संचालक दशरथ पाटील, पायल हॉटेल संचालक जितेंद्र गिरासे , सुरज ट्रॅक्टरचे संचालक नंदू गिरासे, विशाल टायरचे संचालक विशाल जाधव, अनिल अग्रवाल, अॅड.योगेश अग्रवाल, आबा धाकड, भुपेश अग्रवाल, वरिष्ठ शाखा प्रबंधक सुभाष अहिरे, उपशाखाप्रबंधक रविंद्र पाटील यांच्यासह अनेक ग्राहकांची उपस्थिती होती.