बँक ऑफ महाराष्ट्रातून सव्वा दोन लाख लांबवले

0

भुसावळ । शहरातील बँक ऑफ महाराष्ट्रमधून चोरट्यांनी दोन लाख 13 हजारांची रोकड कॅशियरच्या कॅबीनमधून लांबवली. मंगळवारी दुपारी 12 ते 12.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बँकेच्या कॅशियरच्या गलथान कारभारामुळे ही घटना घडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.कॅशियर राजेंद्र शंकरराव पगारे (57, बंब कॉलनी, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिसात फिर्याद दिली. पाच सीसीटीव्हीच्या निगरातीत बँक असलीतरी सीसीटीव्ही अत्यंत तकलादू असल्याचे मंगळवारच्या घटनेतून स्पष्ट झाले आहे. कॅशियर यांना एका इसमाने बोलावल्याने ते सहज त्याच्यापर्यंत कॅबिनला लॉक न लावताच पोहोचले. चोरट्याने या संधीचे सोने केले. अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी भेट दिली. कॅशियरच्या हलगर्जी पणाबद्दल पोलीस स्वतंत्र अहवाल देतील, असे नीलोत्पल म्हणाले.