तळोदा । येथील बडोदा बँकेतील कॅशीयरने महिलेशी अरेरावी करत उडवा उडवीचे उत्तर दिल्याने कॅशीयरच्या अरेरावीबद्दल बँकेच्या प्रवेशद्वार जवळ ग्राहकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या यामुळे बँकेच्या एकंदरीत कार्यपध्दती बाबत प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.तळोदा शहरातील मध्यवर्ती भागात असणार्या बडोदा बँकेत सायंकाळी 4:30 वाजता तालुक्यातील बुधावल येथील प्रतिभा बचत गटाच्या रंजना आत्माराम पाडवी बुधावल व भंवर महिला पैसे काढण्यासाठी आल्या असता आता वेळ झाली असून बँकेतप्रवेश केल्यास आमच्या सोबत रात्री 8 वाजता बाहेर निघता येईल असे उत्तर कॅशीयरकडून देण्यात आले.
दोन तास ठेवले ताटकळत
दरम्यान याबाबत माजी उपनगराध्यक्ष व प्रगतिशील शेतकरी अनिल पुंडलिक माळी यांनी बँकेच्या दरवाजा उघडण्यास कॅशीयरला सांगितले. मात्र यावेळी उद्धटपणे उत्तर मिळाल्याने अनिल माळी यांनी आक्रमकपणे महिलेची बाजू मांडली. दरम्यान ग्रामीण भागातील महिलेला असतांना मात्र 2 तास ताटकळत उभे बँकेच्या बाहेर बसून राहवे लागले या बाबत काही काळ बेकेच्या प्रवेशद्वार जवळ एकच गर्दी जमा होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. याप्रकाराबाबत बद्दल ग्राहकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याबाबत बँकेतील अधिकार्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला तर कॅशीयर अमर मगर यांची भेट घेतली असता आमच्या बँकेत अपूर्ण कर्मचारी असल्याचे सांगत वेळ झाली असल्यामुळें सदर महिलेला प्रवेश नाकारल्याचे सांगितले.