जळगाव । बँक ऑफ बडोदा, देना बँक व विजया बँक यांचे विलीनीकरणास विरोध करण्यासाठी व मोठे थकीत औद्यागिक कर्जाची वसुली या मागण्यांसाठी सर्व बँकाँचे अधिकारी व कर्मचार्यांकडून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनअंतर्गत एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता. या संपात जिल्ह्यातील सर्व बँक अधिकारी व कर्मचारी बंदमध्ये सहभागी झाल्याने सर्व कामकाज ठप्प झाले. यात कर्मचार्यांच्या एक दिवशीय संपामुळे साधरणतः 350 कोटींचे क्लिअरींग होऊ शकलेले नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखा जळगाव येथे सर्व बँकांचे अधिकारी व कर्मचार्यांनी सरकार व बँक व्यवस्थापन विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.