पनवेल । नवी मुंबई सानपाडा सेक्टर 11 मधील बँक ऑफ बडोदावर पडलेल्या दरोड्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस पथकांनी 11 आरोपींच्या मुसक्या आवळून हे प्रकरण उघडकिस आणले. भुयार खोदून हा दरोडा टाकण्यात आला. शनिवार-रविवार दोन सुट्टीचे दिवस पाहून हा दरोडा पडला होता. सोमवारी सकाळी, 13 नोव्हेंबरला बँक उघडल्यावर दरोड्याचा प्रकार उघडकीस आला. भक्ती रेसिडन्सी या इमारतीमध्ये बॅक ऑफ बडोदाची जुईनगर शाखा असून त्याच इमारतीच्या शॉप क्रं. 7 मधील पाच ते बारा फुट खोल, अडीच फुट रूंद आणि अंदाजे 45 ते 50 फुट लांबवर हे भुयार खोदण्यात आले होते.बॅकेत एकूण 237 लॉकर असून त्यातील 30 लॉकर तोडण्यात आले आहेत. कोणते लॉकर तोडण्यात आले आहेत तेही बॅकेने प्रसिध्द केले आहे.
सात किलो सोने हस्तगत
सानपाडा, सेक्टर-11 येथील बँक ऑफ बडोदाच्या जुईनगर शाखेवर अंडरग्राऊंड भुयाराच्या माध्यमातून दरोडा टाकून फरार झालेल्या दरोडेखोरांच्या टोळीतील आतापर्यत 1) श्रावण हेगडे, 2) मोईन खान, 3) हाजी अली मिर्झा बेग, 4) अंजन मांझी उर्फ अंजू यांना गोवंडी बैंगनवाडीतून अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली कार व काही दागिनेही हस्तगत करण्यात आले आहेत. अटकेत असलेल्या दहा आरोपींपैकी सहा जणांना महाराष्ट्रात, तीनजणांना उत्तर प्रदेशात तर एकाला कोलकता येथून अटक केली आहे. पोलिसांची सर्व पथके नवी मुंबईत परतली आहेत.