बँक व्यवस्थापकांच्या खुर्चीला घातला पुष्पहार

0

वरणगाव । गेल्या महिन्याभरापासून येथील सेंट्रल बँकेत व्यवस्थापक नसल्यामुळे येथील दैनंदिन कामकाज व कर्मचार्‍यांवर कोणताही अंकुश नसल्याने बॅकेच्या ग्राहकांना अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बँकेच्या व्यवस्थापकांच्या रिकाम्या खुर्चीला पुष्पहार घालून आंदोलन करण्यात आले. तसेच व्यवस्थापक लवकर हजर न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. येथील बॅकेचे व्यवस्थापक यांच्या ऑफिस मधील खुर्चीला व एटीएम कायमस्वरुपी बंद राहात असल्याने फुलहार लावून आंदोलन छेडण्यात आले.

कर्मचार्‍यांकडून ग्राहकांना असहकार्य
वरणगाव शहराची लोकसंख्या 60 हजाराच्यावर आहे. शहरात एकमेव राष्ट्रीयकृत सेंट्रल बॅक आहे. बँकेत सुमारे 20 हजार ग्राहकांचे खाते आहेत. याठिकाणी वरणगाव शहर व परिसरातील ग्राहक नियमितपणे येत असतात. ग्राहकांना काही अडचणी उद्भवल्यास तसेच पासबुक नोंदणी करण्यासाठी गेल्यास येथील कर्मचारी ग्राहकांना सहकार्य करीत नाही. बँकेचे व्यवस्थापक गेल्या महिन्यापासून येत नसल्याने काही अधिकारी व कर्मचारी ग्राहकांशी अरेवारी करीत असतात. विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना त्याच्या कामकाजात अडचणी निर्माण होत आहे. तसेच पेशनधारकांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागत आहे.

तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
सेंट्रल बँकेत पुरेसा स्टाफ असतांना देखील ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर काही कर्मचारी फक्त वेतनापुरते काम करतात. अशा अनेक सोयीसुविधा नसल्याने येथील राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष संतोष माळी, पक्षाचे गटनेते राजेंद्र चौधरी यांसह कार्यकत्यांनी सकाळी 11.30 वाजेला व्यवस्थापकाच्या खुर्चीला व नेहेमी बंद असलेले एटीएम मशीनला पुष्पहार घालून आंदोलन छेडण्यात आले. तसेच व्यवस्थापक लवकर न हजर झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन देखील छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. यावेळी अमोल पाटील, गोविंदा गावंडे, छोटू माळी, शोभराज शेळके, जितेंद्र कोलते, जनार्दन इंगळे, रविंद्र पाटील, दिपक मराठे, राजेश चौधरी, गजानन वंजारी आदी राष्द्रवादी कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.