बंगळुरू:- बंगळुरूच्या संघाने दुसऱ्या ११ व्या सत्राच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबला आपल्या घरच्या मैदानावर धूळ चारली. आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने १५५ धावांचे लक्ष्य दिले होते. सलामीवर लोकेश राहुलने सर्वाधिक ४७ धावा केल्या. करुण नायर २९ आणि कर्णधार अश्विनने ३३ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करतांना बंगळुरूच्या टीमने १९.३ षटकांत ४ गड्यांनी सामना हा जिंकला. बंगळुरूचा या सत्रामधील हा पहिला विजय ठरला.
डिव्हिलियर्सने(५७) धडाकेबाज फलंदाजी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजय मिळवून दिला. बंगळुरू संघाने ६ गड्यांच्या मोबदल्यात विजयाचे लक्ष्य सहज गाठले.