बंगळुरू कसोटी डीआरएस प्रकरणी कर्णधारावर कारवाई नाही

0

नवी दिल्ली । बंगळुरू येथील दुसर्‍या कसोटी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ पायचित बाद झाल्यावर त्याचे डिआरएस निर्णय घेण्यासाठी ड्रेसिंगरूममधल्या आपल्या सहकार्‍यांकडे सहाय्याची अपेक्षा केली होत.यावर कर्णधार विराट कोहलीने आक्षेप घेतला होता.याची पंचाकडे तक्रार सुध्दा केली होती.मात्र याप्रकरणी आयसीसीने स्पष्टीकरण दिले आहे की,बंगळुरु कसोटीतील डीआरएस वादाप्रकरणी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही.

आयसीसीवर सुनिल गावसकरांचा संताप अनावर
डिआरएस चे प्रकरण आयसीसीकडे गेले होते. आयसीसीने बगळुरू येथील कसोटी सामन्यातील दोन्ही बाजूंची पडताळणी केल्यानंतर दोन्हीही संघाच्या कर्णधारांवर कारवाई करणार नसल्याचे स्पष्ट केले. उभय संघाच्या कर्णधारांवर कोणत्याही प्रकारच्या दंडाची कारवाई होणार नसल्याचेही आयसीसीने म्हटले आहे.बंगळुरु कसोटीत दोन्हीही संघाच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. आता रांचीत खेळल्या जाणार्‍या तिसर्‍या कसोटीवर उभय संघांनी लक्ष केंद्रित करावे. या सामन्यापूर्वी पंच आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांमध्ये बैठक होईल, ज्यामध्ये आपापल्या जबाबदार्‍यांची आठवण करुन दिली जाईल, अशी माहिती आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी दिली.

बंगळरू कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने डीआरएस घेण्यासाठी पेव्हीलीनकडे विचारणा केली होती.त्यावर विराट कोहलीने पंचाकडे तक्रार केली असता स्टीव्हने मैदान सोडले होते.मात्र याप्रकरणात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर (आयसीसी)ने स्टीव्ह स्मिथ विरोधात कोणतीच कारवाई केल नाही,यामुळे भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर (आयसीसी) टिका केली,काही देशांना झुकते माप दिले जाते आणि काही देशांना दिले जात नाही. जर अशी चुक उद्या भारतीय खेळाडूने केली तर त्याच्यावरही कारवाई झाली नाही पाहिजे असे सुनिल गावस्कर म्हणाले.’विराट कोहलीला आऊट दिल्यानंतर तो रिव्ह्यूसाठी ड्रेसिंग रुमकडे पाहत असेल आणि त्याला तेथून काही उत्तर मिळावे असे होताना पाहायला मला आवडेल. त्यानंतर अम्पायर आणि आयसीसी काय निर्णय घेतात ते मला पाहायचे आहे’, असे सांगत सुनील गावसकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.