बंगालचा सप्तर्षी रॉय अजिंक्य

0

मुंबई । पश्चिम बंगालचा इंटरनॅशनल मास्टर सप्तर्षी रॉयने आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित शालिनीताई भालेकर स्मृती चषक खुली जलद बुध्दिबळ स्पर्धा जिंकली. अपराजित राहून सप्तर्षी रॉयने स्पर्धेमधील प्रमुख प्रतिस्पर्धी गुजरातचा इंटरनॅशनल मास्टर राहुल संगमाचे आव्हान मागे टाकत अजिंक्यपदाचा मार्ग सुकर केला. स्पर्धेमध्ये गुजरात, बंगाल आणि महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतील आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित 82 बुध्दिबळपटूसह एकूण 109 खेळाडू सहभागी झाले होते. स्पतर्षी रॉयने साखळी लढतीतील सर्व सामने जिंकले होते.