चाळीसगाव । चाळीसगाव येथील जुना मालेगाव रोडस्थित बंजारा कॉलनीतून ५२ वर्षीय महिला घरातून फिरायला जाते असे सांगून २३ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी ६ वाजता निघून गेली असून अद्याप पावेतो परत न आल्याने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. राजेंद्र दिलीप जाधव यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरमध्ये म्हटले आहे की, लताबाई दिलीप जाधव (वय ५२) रा. जुना मालेगाव रोड बंजारा कॉलनी चाळीसगाव या दि. २३/९/२०१७ रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास फिरायला जाते असे सांगून राहते घरुन निघुन गेल्या त्या अद्याप परतल्या नाहीत. त्याच्या नातेवाईक व इतर सर्वत्र ठिकाणी शोध घेतला असता त्या मिळून न आल्याने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला ५२/२०१७ प्रमाणे हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार एकनाथ चौधरी करीत आहेत.