जळगाव । बंजारा समाजाचे आरक्षण रद्द करण्यासाठी दबाव आणण्याच्या हेतूने तेलंगणातील आदिलाबाद येथे गौंड आदिवासी लोकांनी बंजारा समाजाचा हसनापूर तांडा येथे हल्ला करण्यात आला. त्यामुळे बंजारा समाजाचे 5 लोकांचा त्यात मृत्यू झाला. तसेच 100 ते 150 बंजारा समाजाचे लोक जखमी झाले. हल्ल्यात बंजारा समाजाचे लोकांची घरेदेखील जाळण्यात येवून नुकसान करण्यात आले. गौंड आदिवासी समाजातील लोकांवर शासनामार्फत कठोर कारवाई करण्यात यावी व बंजारा समाजाचे लोकांना न्याय मिळवून द्यावा.
नुकसान भरपाई देण्याची केली मागणी
या हल्ल्यात मृत्यू झालेल्या लोकांना शासनाकडून प्रत्येकी 25 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी व ज्यांची घरे जळून खाक झाली आहेत. त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा अन्यथा अखिल भारतीय बंजारा सेना-भारत हे संपूर्ण देशात आंदोलन छेडेल असा इशारा बंजारा सेनेने दिला आहे. हल्ल्याची केंद्र सरकार व राज्य सरकारमार्फत सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकार्यांकडे केली. यावेळी बंजारा सेना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कांतीलाल नाईक, बंजारा युवा सेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शालिक पवार, प्रा.दिलीप राठोड, प्रा.सुभाष पवार, बंजारा विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आकाश पवार, राजु जाधव, रतिलाल जाधव, सुधाकर बंजारा, ज्ञानेश्वर राठोड, श्रीराम राठोड, सुभाष जाधव, पिंटू जाधव, किसन जाधव आदींची उपस्थिती होती.