बंटी पथरोडसह चौघांविरुद्ध गुन्हा : खाद्य पदार्थ विक्रेत्यास लुटले

0

भुसावळ- रेल्वे गाडीत खाद्य पदार्थ विक्री करत असल्याच्या कारणावरून युवकास मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता दगडी पुलाजवळ घडली. शेख रफीक शेख साबीर व त्याच्या मित्राला शुक्रवारी सकाळी दगडी पुलाजवळ गाडीतून खाली उतरल्यानंतर बंटी पथरोड, विष्णू पथरोड, शिव पथरोड आणि मोहित (पूर्ण नाव माहित नाही) यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच चौघांनी त्याच्या जवळील 11 हजार रूपये रोख आणि मोबाईल असा एकूण 15 हजार 400 रूपयांचा ऐवज हिसकावून घेतला. शेख रफीक याच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.