बंडाचा झेंडा फडकविणारे न्यायाधीश जे.चेल्लमेश्वर आज सेवानिवृत्त

0

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकविणारे न्यायाधीश जे.चेल्लमेश्वर आज सेवानिवृत्त होत आहेत. गेल्या ७ वर्षांपासून चेल्लमेश्वर सर्वोच्च न्यायालयात कार्यरत आहेत. आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या खटल्यांचा त्यांनी निकाल दिला. आपल्या सडेतोड भूमिकांमुळे चेल्लमेश्वर कायम चर्चेत राहिले.

न्यायाधीश रंजन गोगई, एम.बी.लोकूर आणि कुरीयन जोसेफ यांच्यासोबत चेल्लमेश्वर यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यापूर्वी देशात कधीही न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेण्यात आली नव्हती. या पत्रकार परिषदेची धूरा चेल्लमेश्वर यांच्याकडे होती. लोकशाही तसेच न्यायपालिकेच्या स्वतंत्र आणि नि:पक्षपातीपणावर ताशेरे ओढले होते. न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूवर शंका उपस्थित केली होती.