मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षातील नाराजांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत पक्षासमोर पेच निर्माण केले आहे. त्या-त्या पक्षाकडून बंडखोरांना थोपविण्याचे प्रयत्न होत आहे. भाजप-शिवसेनेला देखील बंडखोरीचा फटका बसू शकतो. यावर मुख्यमंत्र्यांनी आणि शिवसेना प्रमुखांनी दोन दिवसात बंडखोरांना अर्ज मागे घेण्याचे आदेश देणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान आज माघारीची अंतिम मुदत असून किती बंडखोर माघार घेतात याकडे लक्ष लागले आहे.
बंडखोरांना शांत करणे सर्वच पक्षासमोर आव्हान आहे. मात्र बंडखोरी थांबविणे देखील महत्त्वाचे आहे.