जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांचे आदेश
जळगाव – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. २१ मार्च अन्वये जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, आस्थापना बंदचे आदेश देण्यात आले होते. मात्र केंद्र सरकारच्या ३ एप्रिलच्या आदेशान्वये या बंदमधुन आता कृषी यंत्रसामग्री, स्पेअर पार्ट, दुरूस्त करणार्या संबंधित आस्थापना, महामार्गावरील (विशेषत: पेट्रोल पंपावरील) ट्रक व मालवाहू वाहनांच्या स्पेअर पार्टची विक्री करणारी दुकाने, दुरूस्ती करणारे गॅरेजेस, चहा लागवड व उद्योग यांच्याशी संबंधित आस्थापना या बाबी (५० टक्के कर्मचारीसाठी) वगळण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज जारी केले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भादवि १८६० (४५) चे कलम १८८ व मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ४३ नुसार कारवाई केली जाणार आहे.