बंदुकीचे लॉक काढताना गोळी सुटून चौघे जखमी

0

वरणगाव सेंट्रल बँकेतील घटना ; सुरक्षा रक्षकाला अटक ; नातेवाईक संतप्त

भुसावळ : बंदुकीचे लॉक काढताना गोळी सुटल्याने तिघा महिलांसह पुरूष जखमी झाल्याची घटना तालुक्यातील वरणगावातील सेंट्रल बँकेत मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. जखमींपैकी एका महिलेची प्रकृती गंभीर आहे तर या घटनेनंतर पोलिसांनी धाव घेत सुरक्षा रक्षकाला अटक केली. या घटनेनंतर जखमींच्या नातेवाईकांनी धाव घेत संताप व्यक्त केल्यानंतर सुरक्षा रक्षकाला अज्ञातस्थळी पोलिसांनी हलवले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरू होते. पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी घटनेनंतर बँकेला भेट देत पाहणी केली.

चौघे जण जखमी
एक्स.सर्व्हिस मॅन लालचंद चौधरी (तापी नगर, भुसावळ) हे वरणगावच्या सेंट्रल बँकेत सुरक्षा रक्षक पदावर नोकरीस आहेत. मंगळवारी दुपारी दोन वाजता त्यांच्याकडील बंदुक लॉक झाल्याने त्यांनी हे लॉक काढताना ट्रीगर दाबल्याने गोळी सुटून ती बँकेत आलेल्या ग्राहक प्रमिला वसंत लोहार (तळवेल), शोभा प्रकाश माळी (वरणगाव) व कलाबाई चौधरी (वरणगाव) व राधेश्याम छबीलदास जैस्वाल (वरणगाव) यांच्या पायाला लागल्याने बँकेत प्रचंड खळबळ उडाली.