सुळे फाट्यानजीकची घटना ; लुटीनंतर ठेकेदाराचे केले अपहरण
शिरपूर- मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सुळे फाट्यानजीक दरोडेखोरांनी बंदूक व धारदार शस्त्राचा धाक दाखवून चौघांकडून 37 हजार रूपयांची लूट केल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडल्याने खळबळ उडाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील ऊसतोड ठेकेदार या परिसरातील मजूर घेण्यासाठी आले असता त्यांचे वाहन दरोडेखोरांनी थांबवून हवेत गोळीबार करत गाडीतील मुक्ताजी रंगनाथ चोपडे (43, रातामसवाडी, ता.नेवासा), सुनील भाऊसाहेब नेमाने (30), गोरक्षनाथ सोपन आरसुडे (39) व संजय किसन मोकाने (35) या चौघांना धमकावत त्यांच्याकडील रोख 37 हजार रूपये व दोन मोबाईल असा एकूण 38 हजार रूपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी हिसकावून नेला़ दरोडेखोरांनी चौघांपैकी सुनील नेमाने याचे अपहरण केले मात्र घटनेचे वृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत व सहायक पोलिस निरीक्षक किरण खेडकर यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत रात्री उशिरापर्यंत अपहरण झालेल्या ठेकेदारास जंगलातून शोधून काढले़