अमळनेरात विशेेष पोलीस पथकाची दादागिरी
अमळनेर प्रतिनिधी: कोरोना विषाणु ( कोविड १९ ) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमळनेर नगरपालीका क्षेत्रात लॉकडाऊन जाहीर केलेले आहे. त्याअनुषंगाने अमळनेर नगरपालीका क्षेत्रात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेल्या प्रत्येक पॉइंटवर येणारे – जाणारे नागरिकांची चौकशी करणेबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. मात्र चौकशी करण्याआधीच बंदोबस्ताच्या नावाखाली चक्क नागरिकांना मारहाण के
ली जात असल्याचा प्रकार आज अमळनेरात विशेष पोलीस पथकातील कर्मचार्यांकडून घडला. या पथकाकडून दादागिरी केली जात असल्याने नागरिकांमधुन तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
अमळनेर शहरात दि. ७ जुलैपासून लॉकडाऊन जाहीर आहे. त्यामुळे नागरिकांना बाहेर फिरण्यास मनाई आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने,
प्रतिष्ठाने बंद आहे. असे असले तरी रूग्णालये, बँक, या कामाच्या निमीत्ताने बाहेर जाणार्या नागरिकांची पोलीसांकडुन चौकशी केली जात आहे. त्यांच्या
वाहनांचे कागदपत्र तपासले जात आहे. विनाकारण बाहेर फिरणार्यांवर पोलीस प्रशासनाकडुन कारवाई केली जात आहे.
विशेष पोलीस पथकाची दहशत
शहरात काही ठिकाणी विशेष पोलीस पथकातील पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. या पथकातील कर्मचारी मात्र मनमानी पध्दतीने शहरातील
नागरिकांवर दहशत निर्माण करीत आहे. खाकीच्या जोरावर केवळ चौकशी करण्याऐवजी नागरिकांना थेट मारहाण केली जात असल्याचा प्रकार आज अमळनेर शहरात घडला. विशेष पोलीस पथकाच्या या दादागिरीबद्दल नागरिकांमधुन तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेष पोलीस पथकातील कर्मचार्यांना असा कुठला विशेष दर्जा व अमानुषपणे मारहाण करण्याची अशी कोणती परवानगी शासनाकडून देण्यात आलेली आहे असा प्रश्न सुज्ञ नागरिक
ांडून उपस्थित होत आहे.