यावल: गृहरक्षक दलाचे दोन जवान ईद उल नबीच्या बंदोबस्तासाठी जळगांव येथे शनिपेठ पोलिस ठाण्यात कर्तव्यावर हजर होणेसाठी आज दुचाकीवर जात असताना अज्ञात वाहनाने समोरून धडक दिल्याने दोघे जवान जखमी झाले. गुरुवारी सायंकाळी सायंकाळी साडेसात वाजेच्या भुसावळ रस्त्यावर हा अपघात झाला. ऋषिकेश वसंत सावखेडकर (32) व चेतन देविदास वारुळकर (30, दोघे रा.यावल ) अशी जखमी जवानांची नावे आहेत. जखमींना यावल ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर जळगावच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.