बंद असलेली भडगाव-वाडे बस पुन्हा सुरु

0

भडगाव । गेल्या दीड महिन्यापासून बंद असलेली भडगाव ते वाडे सकाळची बस बंद असल्याने विद्यार्थ्यांसह गावकर्‍यांचे प्रचंड हाल होत होते. ही बससेवा सुरु करण्याची मागणी होत होती. परिवहन महामंडळातर्फे भडगाव ते वाडे बस पुन्हा सुरु करण्यात आली आहे. वाडे ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत सदस्या उषाबाई अशोक परदेशी यांनी बस सुरू करण्याची मागणी पाचोरा आगार प्रमुखाकडे निवेदनाद्वारे केली होती. पुन्हा बस सेवा सुरु करण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे. त्याची तात्काळ दखल तसेच जळगाव वाडे बसही सुरू करण्याची सूचना देण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यापासून भडगाव ते वाडे ही बस बंद करण्यात आली होती. तर दोन वर्षा पासून जळगाव वाडे व मुक्कामी जळगाव बस बंद केली आहे. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे.

बससेवा सुरु झाल्याने आनंदी वातावरण
बस सेवा सुरू झाल्याने विद्यार्थी व प्रवाशांना सोयीचे झाले आहे. या बसेस सुरू करण्यासाठी आमसभेत आमदार किशोर पाटील यांच्याकडे उशाबाई परदेशी यांनी मागणी करुन या बसेस सुरु झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. पाटील यांनी बस सुरु करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आता सुरु असलेल्या बसेसच्या नियमित फेर्‍या ठेऊन जळगाव वाडे व मुक्कामी बस पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे. वाडे बस सुरू झाल्याने भडगाव वदधे, बोदर्डे, देव्हारी, कनाशी, कोटली, निंभोरा, गौडगाव, लोन पिराचे आदी 14 गावांना या बसचा फायदा होऊ शकतो. बस सुरु झाल्या मुळे ग्रामस्थांनी आमदार, बस आगार व्यवस्थापक, स्थानक प्रमुख यांचे आभार मानले आहे