बंद असलेले जिल्हा रूग्णालय पुन्हा सुरू करा

0

धुळे । शहरातील जिल्हा रूग्णालयातून हिरे मेडीकल महाविद्यालय विभक्त झाल्यापासून शासकिय जिल्हा रूग्णालय बंद झाले आहे. मागील वर्षी शासनाने धुळे जिल्हा रूग्णालयात महिलांसाठी शंभर खाटा व बालकांसाठी शंभर खाटा असे दोनशे खाटांचे रूग्णालय त्वरीत सुरू करणेबाबत जाहीर केले होते. परंतू त्याची अद्याप शासनाने अंमलबजावणी केलेली नाही. यामुळे शहरातील नागरीकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. हिरे मेडीकल महाविद्यालय हे शहरापासून खुपच लांब आहे. म्हणूनच शासनाने बंद असलेले जिल्हा रूग्णालय लवकर सुरू करून गोरगरिब जनसामान्यांना दिलासा द्यावा अशा मागणी आम्ही धुळेकरसंघटनेच्या पदाधीकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेवून निवेदनाद्वारे केली आहे.

शासनाकडे गेल्या दिडवर्षापासून पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतू शासनाकडून जाहीर करूनही अद्याप जिल्हा रूग्णालय सुरू करणेबाबत कार्यवाही शुन्य आहे. म्हणूनच जिल्हाधिकार्‍यांनी यात लक्ष घालावे अशी विनंती यात केली आहे. याप्रसंगी आम्ही धुळेकर संघटनेचे धनंजय गाळणकर, इम्रान शेख, भुषण बागुल, हर्षल शिनकर, डॉ.श्रीकृष्ण बेडसे, नानासाहेब जाधव, राजेश देवरे, संजय सोनवणे उपस्थीत होते.