जळगाव – निमखेडी शिवारात असलेल्या फर्टीलँड इंन्डस्ट्रीज ॲण्ड फायोकेम इंटर नॅशनल या बंद पडलेल्या कंपनीतून 15 सप्टेंबर 2018 रोजी चार चोरट्यांनी 65 हजार 700 रूपयांचा लोखंडी सामान चोरून नेला होता. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अज्ञातांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील तीन आरोपींना मंगळवारी 18 रोजी अटक करण्यात आली आहे. तिघांना आज न्यायालयात हजर केले असता तिघांना 21 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अधिक माहिती अशी की, प्रविणचंद्र जिनाभाई पटेल (वय-74) रा. पटेल नगर, रामानंद नगर यांचे निमखेडी शिवारातील शेत गट क्रमांक 12/1 व 10 मधील फर्टीलँड इंन्डस्ट्रीज ॲण्ड फायोकेम इंटर नॅशनल ही कंपनी गेल्या महिन्याभरापासून बंदावस्थेत आहे. 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेपुर्वी कंपनीतून 65 हजार रूपये किंमतीचे गोडावूनचे छताचे लोखंडी अँगल, पत्राचे शटर, छताचे पत्राचे लोखंडी हुक व इतर खिडकीचे भंगर असे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. याबाबत प्रविणचंद पटेल यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी डिगंबर भागवत कोळी (वय-35), राहुल रविंद्र बाविस्कर (वय-28), सुनिल शहादु आढाळके (वय-36) सर्व रा. निमखेडी ता.जि.जळगाव यांना 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता अटक करण्यात आली तर चौथा आरोपी सागर दिलीप कोळी हा फरार आहे. आज तिघांना न्यायालयात हजर केले असता तिघांना 21 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे ॲङ सुप्रिया क्षिरसागर यांनी काम पाहिले.