बंद करो अब यह हिंदू-मुसलमान, आसिफा के साथ है हरदम पुरा हिंदुस्थान !

0

तळोदा । देशात महिलांवर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधामध्ये समाजजागृतीसाठी व समाजकंटकांवर 30 दिवसात कारवाई होण्यासाठी तळोद्यात गणेश सोशल ग्रुप कॉँग्रेस पक्ष, लोकसंघर्ष मोर्चा, आदिवासी युवाशक्ती आदींसह विविध संघटनाच्या वतीने कॅन्डल मार्च काढून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने महिला पुरुष सहभागी झाले होते. तळोदा येथील स्मारक चौक येथे सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास कॅन्डल मार्चला सुरुवात करण्यात आली. यावेळी सहभागी लोकांनी काळ्या फित्या बांधून निषेध व्यक्त केला. तर, भारत को न्याय चाहीये आसिफा के गुन्हेगारो को फाशी दो, बंद करो ये हिंदू मुस्लमान आसिफा के साथ है पुरा हिंदुस्थान असे विविध फलकांच्या दाखवत निषेध व्यक्त करण्यात आला.

कठोर शिक्षेची मागणी
सभेत प्रतिभाताई शिंदे यांनी राज्यासह देशात युवतींवर घडत असणार्‍या अत्याचाराचा निषेध करीत संतप्त भावना व्यक्त केल्या. तसेच युवतींवर अत्याचार करणारे अनेक आरोपी मोकाट असून अद्यापही त्यांना शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी आरोपींना 30 दिवसाच्या आत न्यायालय सुरू ठेवून कठोर शिक्षा देणे गरजेचे आहे. असे झाल्यास पुन्हा अशा घटना घडणार नाहीत. यामुळे तात्काळ शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी केली.

बालिकेला श्रध्दांजली
यावेळी मौलाना शोएब रजा नूरी, देविदास शेंडे, प्रा.ए.टी. वाघ, शानुताई पाडवी, आदींनी मनोगत व्यक्त करत घटनेच्या निषेद व्यक्त केला. त्यानंतर घटनेचा निषेध व्यक्त करत मयत बालिकेला श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जिप उपाध्यक्ष सुहास नाईक, प्रतोद संजय माळी, गटनेते गौरव वाणी, नगरसेवक सुभाष चौधरी, जितेंद्र सूर्यवंशी, हितेंद्र क्षत्रिय, योगेश मराठे, संदीप परदेशी योगेश मराठे, अरविंद मगरे, संदीप परदेशी, रोहिदास पाडवी, गौतम जैन, विनोद माळी, संजय महाजन, राजकुमार पाडवी, अकबर हिदायद, यु.जी.पिंपरे, मुख्याध्यापक निमेश माळी, अविनाश टवाळे, डॉ.किशोर सामुद्रे, सुहास नाईक, ऍड सचिन राणे, माजींनगरसेवक पंकज राणे, भाऊदादा पाडवी, आकाश पाडवी, आदींसह महिला पुरुष स्मारक चौकात मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कँडल मार्चला लोकसंघर्ष मोर्चा, आदिवासी युवा शक्ती, चिस्तीया ग्रुप, ब्लु टायगर बॉईज, जयभीम नवयुवक मंडळ, लहूजी वस्ताद सोशल ग्रुप, संत रविदास ग्रुप तळोदा, आदीं संघटना सहभागी होते

काळीमा फासणार्‍या घटना
पद्माकर वळवी यांनी महिला व बलिकेवर होणारे घटना या काळीमा फासणार्‍या आहे. या घटनेला कश्मीर येथील राजकीय लोकांचे समर्थन हे निंदनीय असून यातून राज्यवस्थवेर प्रश्‍न निर्मान होतो. अश्या घटना होऊनही गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जाते. समाज हेलवणार्‍या असली प्रकरण दाबने अत्यन्त चुकीचे असून समाज कंटकांना 30 दिवसात फाशी देण्याची मागणी यावेळी पद्माकर वळवी यांनी केली आहे.