राजमालतीनगरात मशिदीशेजारी घरात आढळला मृतदेह
जळगाव । दुध फेडरेशनजवळील राजमालती नगरातील मशिदीच्या शेजारील रुममध्ये एका ६५ वर्षीय प्रौढाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना शुक्रवावरी १५ रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी दुपारी उशिरापर्यंत शहर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते. गेंदालाल मिल मध्ये अरुण धर्मदास वाघ वय ६५ यांचे वेल्डिंगचे दुकान आहे. पत्नीचे निधन झाले असल्याने ते गेल्या चार-पाच वर्षापासून राजमालती नगरातील बिस्मीला आरबी मदरसा मधील एका खोलीत राहत होते. दोन दिवसांपासून या खोलीचा दरवाजा बंद होता. शुक्रवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास मशिदीचे मौलाना मुनिर बिस्मीला पटेल यांना या ठिकाणी दुगर्ंधी येवून लागली अशी माहिती पोलिसांकडून व प्रत्यक्षदर्शींकडून मिळाली.
शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
याबाबत नगरसेवक राजू पटेल यांना माहिती दिली. त्याठिकाणी नगरसेवक पटेल आल्यानंतर मशिदीतील अजान देणारे बागी साहब यांच्या मदतीने या खोलीचा मागील दरवाजा तोडण्यात आला. दरवाजा तोडताच या खोलून दुगर्ंधी येवून लागली. या खोली अरुण धर्मदास वाघ यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. नगरसेवक पटेल यांनी याबाबत तात्काळ शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी सपोनि. जानकर यांच्यासह पथकाने धाव घेवून घटनेची माहिती घेतली. त्यानंतर फॉरेन्सिक विभागाने त्याठिकाणी येवून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान वाघ यांच्या दुसर्या पत्नीची मुलगी रुकसानबी शेख फिरोज हीने १३ सप्टेंबर रोजी वडील अरुण वाघ यांच्याशी फोनवर बोलणे झाले होते. मोठ्या बहीण शबनम यांच्या नात्यात विवाह सोहळया असल्याने ते अमळनेर येथे येणार होते. याचवेळी त्यांनी प्रकृती ठिक नसल्याचे रुकनाबी यांना फोनवर सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले. वाघ यांचे भाऊ दोंडाईच्याला तर मुलगा बाहेरगावी असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या घटनेप्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.