बंद घराचे लॉक तोडून भरदिवसा चोरी

0

चिंचवड : बंद घराचे लॉक तोडून चोरट्यांनी 66 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना काळेवाडी नढेनगर येथे शनिवारी (दि. 1) सकाळी अकरा ते रात्री नऊ या कालावधीत घडली. याप्रकरणी 29 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसानी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर बंद होते. शनिवारी सकाळी अकरा ते रात्री नऊ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लॉकर उचकटून सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 50 हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. रात्री नऊ वाजता फिर्यादी घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.