बंद घरातून चोरट्यांनी लांबविला 18 हजारांचा मुद्देमाल

0

शिरपूर। शहरातील कॉलनी परीसरातील बंद घराच्या दरवाज्याची कङी तोङुन अज्ञात चोरट्यानी सुमारे 18 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना उघङकीस आली. याबाबत पोलिसांत अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील बालाजी नगरातील प्लाट नं.3 मध्ये राहणार्‍या मंगला वामन मोरे याबाहेर गावाला गेल्या होत्या.गावाहुन परत आल्यानंतर त्यांना घराच्या दरवाज्याची कङी तोङलेली दिसली. त्यांनी घरात प्रवेश केला असता सर्व सामान अत्याव्यस्त पङलेला दिसला.घरातील 9हजार रुपये किमतीचा एलएङी सोनी कंपनीचा टिव्ही, तीन हजार रुपये किमतीचा निकाँन कपंनीचा कँमेरा,सहा हजाराच्या कानातील सोन्याच्या रिंगा,500 रुपयाचे आठभारचे चांदीचे पैजन व पितळी हंङा असा 18 हजार 600 रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेला.