बंद घरातून 30 हजारांची मंगळसूत्र लांबवले : भुसावळातील घटना

Daring burglary in Hudko Colony in Bhusawal भुसावळ : शहरात चोर्‍या-घरफोड्यांचा तपास कागदावरच असतानाच हुडको कॉलनीत घरफोडी झाल्याची बाब शनिवारी उघड झाली असून चोरट्यांनी 30 हजारांचे मंगळसूत्र लांबवल्या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
तक्रारदार अभिषेक चंद्रकांत वाणी (51, सी., हुडको कॉलनी, मिरची ग्राऊंडजवळ, वांजोळा, भुसावळ) हे बाहेरगावी गेल्याने 5 रोजी रात्री ते 6 ऑगस्टच्या पहाटे दरम्यान चोरट्यांनी संधी साधून बंद घराचा कडी-कोयंडा तोडून कपाटातील 15 ग्रॅम वजनाचे व 30 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र लांबवले. तपास हवालदार जितेंद्र पाटील करीत आहेत.