चाळीसगाव । बंद घराचे कडी कोयंडा व कुलुप तोडुन घरातील 4900 रुपयांच्या संसारोपयोगी वस्तुंसह गोधड्या, ब्लँकेट व साड्या अद्न्यात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना 11 ते 12 जानेवारी रोजी 2018 रोजी दुपारी 3 वाजेदरम्यान घडली आहे. चाळीसगाव तालुक्यातील बाणगाव येथील योगेश हिरामण परदेशी (32) यांचे खेर्डे शिवारातील शेतात घर असुन ते आई व पत्नीसह तेथे राहतात व बाणगाव गावातील त्यांचे घर बंद असते तेथे ते फक्त सकाळी येवुन साफसफाई करुन निघुन जातात याचा फायदा घेवुन अद्न्यात चोरट्याने 11 रोजी रात्री 11 ते 12 रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान बंद घराचा दरवाजाचा कडी, कोयंडा व कुलुप तोडुन घरातील 4900 रुपये किमतीचे तांबे पितळाचे भांडे व गोधड्या, ब्लँकेट व साड्या असा मुद्देमाल चोरुन नेला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अद्न्यात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.