भुसावळ। मध्यरात्रीच्या सुमारास बंद घराचे कुलूप तोडून लॅपटॉपसह साड्या चोरीस गेल्याची घटना रेल्वे फिल्टर हाऊससमोर असलेल्या रेल्वे कॉर्टरमध्ये गुरुवार 22 रोजी घडली. दरम्यान या भागात सहसा चोरीच्या घटना नाही, मात्र या घटनेमुळे परिसरात खळबड उडाली आहे.
शहरातील रेल्वे फिल्टर हाऊस समोरील रेल्वे वसाहतीमधील रहिवासी स्वाती चतुर्वेेदी (43, रेल्वे फिल्टर हाऊससमोर, क्वार्टर नं. एम.बी. 374) या मध्यप्रदेशातील मुलीसह आई-वडिलांकडे गेल्याने घराला कुलूप होत़े. चोरट्यांनी ही संधी साधत घरातील जुना 5 हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप तसेच 3 हजार रुपये किंमतीच्या साड्या लंपास केल्या़. गावातून परतल्यानंतर घरफोडी झाल्याचे उघडकीस आल़े या प्रकरणी स्वाती चतुर्वेेदी यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ तपास पोलीस निरीक्षक वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.टी. सोनवणे करीत आहेत.