Daring house burglary in Shree Nagar in Bhusawla: 2.5 Lakhs instead of loot भुसावळ : शहरातील श्री नगरातील बंद घर फोडून चोरट्यांनी अडीच लाखांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घरे चोरट्यांना कुरण
तक्रारदार हेमा अर्जुन ढोलपूरे (२७, श्रीनगर, श्री विठ्ठल मंदिरासमोर, भुसावळ) या कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली. २५ ते २९ नोव्हेंबरदरम्यान केव्हातरी चोरट्यांनी बंद घरातील कपाटातून एक लाख ५६ हजार ६८० रुपयांचे सोन्याचे दागिणे तसेच एक लाखांची रोकड मिळून दोन लाख ५६ हजारांचा ऐवज लांबवला.
शहर पोलिसांची धाव
तक्रारदार गावावरून परत आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक गजानन पडघण व सहकार्यांनी पाहणी केली. तपास एएसआय मोहम्मद अली सैय्यद करीत आहेत.