भुसावळ। खडकारोड परिसरातील बंद असलेल्या घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील सोन्याच्या दागिण्यांसह 1 लाख रुपयांचा ऐवज चोरटयांनी लंपास केल्याची घटना सोमवार 31 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास उघडकिस आली आहे. याबाबत बाजारपेठ पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
14 दिवसांपासून घर होते बंद
पाटील मळ्यातील रहिवासी रजिया बेगम लुकमान गनी (वय 73) यांचे कुटुंब 18 ते 31 जुलै दरम्यान बाहेरगावी होते. घर बंद असल्याचे पाहुन चोरट्यांनी संधी साधत कपाटातील 72 हजार रुपयांचे तीन तोड्याचे सोन्याचे कंगन, 24 हजार रुपयांचे कानातील दोन जोड, 4 हजार रुपये रोख असा 1लाखाचा ऐवज चोरट्यांनी लांबविला.
बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. बाजारपेठ पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे व सहकारी करीत आहे.