शहादा। तालुक्यातील डोगरगाव लगत नितीन नगर भागात रो हाऊस मधील कुटूंब कानुबाईच्या कार्यक्रमास गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. लोखंडी कपाटाचा दरवाजा टॅमी दगडाने फोडून कपाटातील रोख एक लाख सदुसष्ट हजार रूपये चोरांनी लंपास केले आहे. कानुबाईचे ऊत्सवात कानुबाई रूसली याचा मोठा झटका लागला आहे. श्वान पथक पाचारण करण्यात आले होते.
शनिवारी बँकेतून काढले पैसे
या घटनेची माहीती अशी की, नितीन नगर भागात रो -हाऊसींग सोसायटीच्या तळमजल्यावर संजय बन्सीलाल जगताप व निंबाजीराव बन्सीलाल जगताप हे दोघे भाऊ मुलांच्या शिक्षणासाठी एकत्र राहतात. शनिवारी त्यांच्या येथे असलोदला (शहादा) कानुबाईची स्थापना होती. शनिवारी फिर्यादी निंबाजीराव जगताप यांच्या मुलाने स्टेट बँकेतून एक लाख रू. रोख रक्कम वटवून आणली होती. रक्कम घरात येताच संजय जगताप यांनी घेऊन जाण्यासाठी म्हटले होते. मात्र अडचण आल्याने ते सहकुटूंब असलोदकडे निघून गेले. या नंतर फिर्यादींची निंबाजीराव जगताप यांनी सदरची रक्कम घरातील लोखंडी कपाटात ठेवून घराला कुलूप लावून गावी निघुन गेले.
शेजार्यांनी दिली माहिती
जगताप कुटुंबीयांनी गावी जातांना शेजारी असलेल्या एका व्यक्तींस घराकडे लक्ष्य देण्याचे सांगितले होते. त्या व्यक्तींनी जगताप यांच्या घराकडे नजर टाकली असता जगताप यांच्या घराचे कुलूप लटकलेले अवस्थेत दिसून आले. सोमवारी कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आल्याने त्यांनी जगताप यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. यानंतर सोमवारी रात्री 8.30 वाजेस लक्षात येताच संजय जगताप हे पंधरा मिनीटात घरी पोहचले त्वरीत पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती दिली.
श्वान पथकास पाचारण
श्वान पथक पाचारण व ठसे तज्ञांंनी घटनास्थळी जाऊन संजय जगताप यांच्या घरातील कुलूप लोखंडी रॉड जप्त करीत इतर स्थळांची ठसे घेतली आहेत. तसेच श्वान पथक यांनी थेट डोंगरगाव रोडवरील डॉ. स्वप्नील सोनार यांचे फिजोओथेरीप रूग्णालया पर्यंत आल्यानंतर श्वान पथक पुढे सरकले नाही. या घटने बाबत निंबाजीराव जगताप यांनी शहादा पोलीसात तक्रार दिली असून घटने बाबत गुन्हा दाखल आहे पुढील तपास स. पो. नि. जाधव करीत आहे.
टॅमीने तोडले लॉकर
जगताप यांच्या कपाटात अगोदरची 63हजार रक्कम होती. गावी कानुबाईचे उत्सव व रोट असल्याने घरी कोणीच नव्होते. रो-हाऊसचे घराचा दरवाजा बंद असल्याचे चोरांना लक्षात आल्याने त्यांनी रविवारच्या रात्री घराचे कुलुप तोडत आत प्रवेश केला. व लोखंडी कपाटाचा खालचा भाग टॅमीने वाकवित फरशीचा तुकड्याने कपाटाचे लॉकर तोडीत त्यातील रोख एक लाख 67हजार रू. चोरांनी लंपास केले. याच वेळी कपाटात महिलेची सोन्याची मंगल पोत व इतर सोन्याचे दागिने चांदीचे दागिने तसेच पडून होते.