जळगाव (कमलेश देवरे) । एमआयडीसीमध्ये अनेक अडचणी व कायदेशीर बाबीमुळे उद्योग बंद पडलेले आहे. व्यापारी जळगाव जिल्ह्यात येण्यासाठी तयार असताना औद्योगिक वसाहतीत जागा उपलब्ध नसल्याने नवीन उद्योग व्यापार्यांना उभारता येत नसल्याने आज अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून याचा परीणाम जिल्ह्यात उद्योग क्षेत्रात मागे पडत आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत बैठकीमध्ये विविध येणार्या अडचणीबाबत व्यापार्यांनी आढावा बैठकीत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्या. यासंदर्भात उद्योगमंत्र्यांन सोबत कॅबिनेटच्या बैठकीत हा मुद्दा मांडणार असल्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी व्यापार्यांना दिले असून नवीन उद्योग आल्यास जळगाव जिल्ह्यातील तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. राजकीय इच्छाशक्ती असल्यास आणि व्यापारी बांधवांची उभारी असल्यास जळगाव नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही.
कागदपत्रासाठी धुळे ते जळगाव प्रवास
एमआयडीसी प्रशासनाच्या संबंधी कोणत्याही प्रकारचे कागदोपत्राची कामे असल्यास धुळे ते जळगाव प्रवास करून कामे करावी लागतात. अधिकार्यांना पैसे देऊनही सुद्धा कामे करीत नाही. पैशाच्या लालसेने कामे करण्यासाठी फिरवण्यात येते. नाईलाजाने पैसे द्यावे लागत असून तरी सुद्धा कामे होत नसल्याची व्यथा जनशक्तीशी बोलतांना व्यापारी वर्गाने व्यक्त केली आहे. कामासाठी धुळे येथील आरोप कार्यालयातील कर्मचारी नेहमी पैसे मागत असतात असा आरोप व्यापार्यांनी पालकमंत्र्यांच्या बैठकीमध्ये केला होता.
उद्योगासाठी लागणार्या जागेचे सर्वेक्षण होणार कधी?
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी निंबाळकर यांना दोन दिवसात महसूलच्या जागांचे सर्वेक्षण करायचे होते. मात्र अद्यापपर्यंत महसूल विभागाच्या वतीने सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली. नसल्याने व्यापारी वर्गाला दिलेल्या आश्वासनानुसार जागेच्या प्रतीक्षेत आहे. अनेक उद्योग एमआयडीसी मध्ये बंद पडलेले आहे. कायदेशीरपणे मशीन सील करण्यात आल्याने त्याजागा अटकून पडल्या आहे. यासाठी शासनाच्या वतीने बंद पडलेले उद्योग सुरु करण्यात यावे यामुळे उद्योगांना चालना मिळणार आहे. नवीन कंपन्या सुरु झाल्यास रोजदारचा प्रश्न एमआयडीसीमुळे सुटणार आहे.
राज्यात 45 हजार 500 उद्योगांना पुनर्जीवन
राज्यात विविध कारणांमुळे बंद असलेल्या 45 हजार 500 उद्योगांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी समिती गठीत करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी कळवली आहे. जळगाव मधील जिंदा ह्या व्यापारी संघटनेचे पदाधिकारी 2 मे रोजी मुंबई येथे जाणार असून जळगाव चे पालकमंत्री व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या सोबत बैठक होणार आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रावर झालेला परिणाम आणि येत असलेल्या अडचणी यावर चर्चा होणार आहे.
1800 कोटीची गुंतवणूक ठप्प
जळगाव सह खान्देशातील एकूण 70 हजाराच्या वर कामगार बेरोजगार आहेत. यामुळे कामगाराच्या परिवारावर बेरोगजरींमुळे कुर्हाळं कोसळली आहे. शासनाची 3488 एकर जमीन पडून असून . राज्यातील बंद कारखान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी सामूहिकरित्या प्रयत्न केल्यास आणि व्यापारीवर्ग व कारखानदारांनी सुचविलेल्या काही उपाययोजना शासनाने हाती घेतल्यास 45,500 पैकी 34, 125 उद्योग पूर्वंवत सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे 20 लाख नवीन रोजगार उपलध्द होऊ शकणार आहेत.