पनवेल । मुस्लीम सामाजिक कार्यकर्ते मंडळ युथ सोशल फाउंडेशनतर्फे बकरी-ईदच्या निमित्ताने गरीब-गरजू कुटुंबीयांना धान्य वाटप करण्यांत आले. कामोठे सेक्टर-20 या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष इमरान अमजद शेख यांच्या कार्यालयांत असरार अहमद यांच्या अध्यक्षतेखाली सदर धान्य वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश प्रवक्ते सय्यद अकबर उपस्थित होते. असरार अहमद, यासीन शेख, समीर शेख, सय्यद रफिक, रईस शेख, फिरोझ आलम, उस्मान गनी अन्सारी, तौसिफ सय्यद, पत्रकार किरण बाथम यांच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले.
दरमहा धान्यवाटप करण्याचा संकल्प
कामोठे, पनवेल, नवी मुंबई परिसरातील सामाजिक युवा कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हे मंडळ स्थापन करण्यात आले आहे. प्रत्येक महिन्याला ठरावीक कुटुंबाची माहिती जमा करून संबंधित कुटुंबीयांना दरमहा धान्यवाटप करण्याचा संकल्प करून या मंडळाचे कार्य सुरु असल्याची माहिती आयोजकांनी दिली. याप्रसंगी पाच किलो तांदूळ, पाच किलो गहू साखर यांसह स्वयंपाकाचे आवश्यक साहित्य प्रत्येकाला देण्यात आले.