रावेर- शहरातून बकर्या चोरणार्या तीन चोरट्यांना रावेर पोलिसांनी अटक केली असून आरोपींच्या ताब्यातून 29 हजाराच्या बकर्या ताब्यात घेण्यात आल्या असून गुन्ह्यातील दुचाकी जप्त करण्यात आली.
आरोपींनी पोलिस कोठडी
29 रोजी रावेर-ईदगाह रस्त्यावरील सप्तशृगीमाता मंदीराजवळील शेख अरमान शेख रहेमान, उस्मान शेख रहेमान, हाजी इकबाल खान महेमुदखान यांच्या मालकीच्या 29 हजार रुपये किंमतीच्या नऊ बकर्या चोरीस गेल्या होत्या. या प्रकरणी संशयीत आरोपी नावीद उर्फ नावा शेख ताहेर (खाटीक वाडा, रावेर), नासीर शेख निसार (रा.खिर्डी, ता.रावेर) व साबीर रफीक खाटीक (रा.इस्लामपूर, सावदा) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, संशयीत आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (जी.जे.03 डी.आर.4784) जप्त करण्यात आली असून आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 4 फेब्रुवारीपर्यत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक रामदास आर.वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी पाळदे, हवालदार शेख, नाईक तायडे, पहुरकर, भरत सोपे, सुरेश मेढे, जाकीर पिंजारी करीत आहेत.