शिंदखेडा। बकर्यांनी शेतातील कणसे खाल्ली असा संशय आल्याने मुंबईत असलेल्या एका पोलीसासह त्याच्या काकाने तिघा बालकांना मारहाण केल्याची घटना दि 19 रोजी दुपारी घडली.
याप्रकरणी पोलिसांत तक्रार झाल्याने गुन्हाही दाखल झाला.याबाबत माहिती अशी की, येथील बंगला भिलाटीत रहाणार्या संदीप संजु भिल(12) व सोनू भाईदास भिल (14) हे काल दुपारी जंगलात बकर्या चारत असता त्यांच्या बकर्यांनी शेतातील बाजरीची कणसे खाल्ली असा संशय आल्याने जगदीश संभाजी देसले व त्याचे काका शरद गोरख देसले या दोघांनी संदीप व सोनूला शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी रमेश जंगलु मोरे (13) हा मध्ये पडला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. मारहाण करणारा जगदीश देसले हा मुंबई पोलीस दलात शिपाई असून या प्रकरणी कैलास जंगलू भिल याने पोलीसांत तक्रार केल्याने गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास शिरपुर उपविभागीय पोलीस अधिकारी शेख करीत आहेत.