बकर्‍या लांबविणार्‍या दोघां चोरट्यांना शनिपेठ पोलिसांकडून अटक

0

3 हजारात विक्री करुन पैसे वाटून घेतल्याची कबूली

जळगाव : शहरातील चौघुले प्लॉट परिसरातून सुमारे 11 हजार रूपये किंमतीच्या तीन बकर्‍या चोरून नेल्याची घटना 01 मे 2019 रोजी घडली होती. या प्रकरणी दाखल गुन्हयात शनिपेठ पोलिसांनी शेखर उर्फ कालू भारोटे (20) तसेच सनी मिलांदे (20) दोन्ही रा. शनिपेठ गुरूनानकनगर या दोघांना गुरूवारी रात्री अटक केली. न्यायालयात हजर केले असता, शेखर भारोटे यास 1 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर मिलांदे याची पे बाँडवर सुटका झाली आहे.

दोघांनी तीन हजार रुपये वाटून घेतले
राजेश हिरालाल वाणी (36) हे चौघुले प्लॉट येथे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. घराशेजारी ते पाळीव बकर्‍या बांधत असायचे. 01 मे रोजी त्यांच्या तीन बकर्‍या अज्ञात चोरटयाने चोरून नेल्या होत्या. या प्रकरणी राजेश वाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. शनिपेठ पोलिसांनी हा गुन्हा रिटेन मागविला होता. यातील दोघे संशयितांबाबत गुन्हे शोध पथकातील दिनेशसिंग पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गुन्ह्याचा तपास असलेले अभिजित सैंदाणे, संजय शेलार, हकीम शेख , नितीन बाविस्कर, परिस जाधव, अनिल कांबळे, राहूल पाटील ,किरण वानखेडे, राहूल घेटे यांच्या पथकासह शेखर उर्फ कालू तसेच मिलांदे (20) या दोघांना ताब्यात घेतले आहे. दोघांना कोंबडी बाजारात 3 हजार रुपयात बकर्‍या विक्री केल्या आणि मिळालेल्या पैशांतून प्रत्येकी 1500 रुपये वाटून घेतल्याची कबूली संशयितांनी दिली आहे. संशयीताना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली.