बक्षिस वितरण उत्साहात

0

भुसावळ। पासबाने मिल्लत एज्युकेशन अ‍ॅन्ड वेेलफेअर सोसायटीद्वारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन मौलाना अब्दुल्लाह यांना कुरान पठन व अमानतुल्लाह युसुफी यांनी नात पठन करुन केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष सै. मुर्तुजा खुशतर भुसावली होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष अख्तर पिंजारी, गटनेेते हाजी मुन्ना तेेली, हाजी अन्सार अहमद, हाजी नसीर पठाण, डॉ. रफिक अहमद, डॉ. नईम शेख, आसिफ शेख, सईद खान, शब्बीर, जुबेर शेख फारुक शेख, तसलीम पहेलवान आदी उपस्थित होते.

मान्यवरांचा सत्कार
हाजी अन्सार अहमद यांना मिळालेल्या महशेर मुस्तफाबादी एवार्डबद्दल पासबानेमिल्लत संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. रफिक अहमद यांची एमसीआयएममध्ये निवड झाल्याबद्दल संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. एस.एम. रजा, शेख मुश्ताक, युसुफअली, शेख कामिल आदींनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन जिया यांनी केले.