मुंबई : बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या लग्नाला आठवडा शिल्लक राहिला आहे. २ डिसेंबरला दोघही लग्न करणार आहेत. दीपिका रणवीरनंतर प्रियांका आणि निक जोनासच्या लग्नाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या विवासोहळ्यासाठी जोधपूरच्या उमैद भवनवर आकर्षक रोशनाई करण्यात आली आहे.
https://www.instagram.com/p/BqnPW0WgWcY/?utm_source=ig_embed
सोशल मीडियावर याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. प्रियांकाचे चाहते तिच्या लग्नाच्या प्रत्येक अपडेटची माहिती मिळवण्यासाठी उत्सुक आहे. या भवनवर थ्री-डी लाईट्सची आकर्षक रोशनाई करण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्या भव्यदिव्य राजवाड्याचे स्वरूप उमैद भवनला प्राप्त झाले आहे. प्रियांकाच्या मुंबई येथील बंगल्यावरही खास रोशणाई करण्यात आली आहे.