बचत गटांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून द्यावे; मुक्ताईनगरात शरद पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !
जळगाव: मुक्ताईनगर येथे महाविकास आघाडीचा जिल्ह्यातील पहिलाच मेळावा होत आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे प्रथमच जिल्ह्यात एकत्र आले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्ह्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. बचत गटाच्या माध्यमातून मोठी चळवळ उभी करण्याची आवश्यकता आहे. बचत गटाच्या महिलांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध झाल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होतील त्यासाठी सरकारने प्रयत्न करावे असे आवाहनही शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केले.
मुक्ताईनगर मतदारसंघातून अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे निवडून आले आहे. त्यांच्या पाठीशी जनता असल्यानेच ते अपक्ष म्हणून निवडून येऊ शकले. त्यांनी तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करावे, त्यांना सर्वतोपरी मदत दिली जाईल असे आश्वासन शरद पवार यांनी दिले.