बचत गटाच्या नावाने शासनाची फसवणूक

0

प्रस्ताव मंजूर प्रकरणाची व्हावी चौकशी : शिवसेना आघाडीचे प्रशासनाला निवेदन

यावल : एका बचत गटाच्या नावाने शासनाची फसवणूक करून शिव भोजन थालीचे प्रस्ताव मंजुर केल्या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून हे शिवभोजन थाली केंद्राची मान्यता रद्द करावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या यावल शहर संघटक सपना घाटगे यांनी तहसीदारांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे केली आहे. सपना घाटगे यांनी निवेदनात म्हटले आहे की, यावल शहरासाठी राज्य शासनाच्या वतीने यावल येथे फालक नगरमध्ये राहणार्‍या सुनीता मुरलीधर भावसार ही महिला यावल शहरच्या एस.टी. आगारामध्ये कायमस्वरूपी कर्मचारी म्हणुन कार्यरत आहे. या महिलेने तालुक्यातील शासनाच्या विविध विभागातील विविध योजनांचे त्यांनी अनुदान घेतले आहे. दरम्यान सुनीता भावसार यांनी विविध महिला बचत गट स्थापन केले असून एका गटात त्यांनी एकाच घरातील दोन दोन महिलांना समाविष्ट केले आहे तसेच या गटातील काही महिला या यावल सोडून बाहेरगावी गेल्या आहेत तर काही महिलांना स्वाक्षरीच येत नाही, त्यांच्या नावांची स्वाक्षरी ते स्वतः करून घेत आहेत. त्या अशा प्रकारे शासनाकडे प्रस्ताव सादर करून तसेच या महिलेने काही अधिकार्‍यांशी आर्थिक देवाण-घेवाण करून शिव भोजन थालीचे प्रस्ताव मंजुर करून घेतल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

फौजदारी गुन्हा व्हावा दाखल
मंजूर झालेल्या शिवशक्ती महिला बचत गटाबाबत संदर्भात संशयास्पद वाटणारे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यात महिला बचत गटाची घटनाप्रत प्रस्तावासोबत जोडलेली नाही, महिला बचत गट संख्यापक कार्यकारी मंडळ त्यांचे नांव कसे, सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांनी मान्य केलेल्या फेरफारचा अहवाल सादर केलेला नाही. त्याचप्रमाणे शिवशक्ती महिला बचत गटाचे ऑडीट आजपर्यंत केलेले नाही तसेच वरील सर्व कागदपत्रे महिला बचत गट संस्था नोंदणीचे कागदपत्रे का घेण्यात आलेली नाही ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. सदरच्या महिलेने आपल्या पतीच्या नावाने दारीद्रय रेषेखालील कार्ड बनवुन शासनाची फसवणूक करीत आहेत. यावल एस.टी. आगारात नोकरी करताना आपल्या वडीलांचे नांव जोडले आहे. शासनाने या सर्व शिवभोजन थाली केन्द्राच्या मंजुरीची तात्काळ चौकशी करून शासनाची चुकीची व अर्धवट माहिती देवुन फसवणूक केल्याप्रकरणी सुनीता मुरलीधर भावसार (शिवशक्ती महिला बचत गट) यांच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे सपना घाडगे यांनी यावल येथे नायब तहसीलदार आर.के .पवार यांच्याकडे केली आहे.