बच्चू कडू गनिमी काव्याने गुजरातेत

0

नंदुरबार : महाराष्ट्र-गुजरात राज्यांच्या सीमांवर आमदार बच्चू कडू यांची सीएम टू पीएम ही आसूड यात्रा अडवण्यात आली. गुजरात राज्यात प्रवेश करताच आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांना गुजरात पोलिसांनी बळाचा वापर करून ताब्यात घेतले होते. त्यामुळे बच्चू कडू यांना आसूड यात्रेच्या माध्यमातून सुरू केलेले आंदोलन स्थगित करावे लागले. दरम्यान आता त्यांची सुटका झाली असून हे आंदोलन पुन्हा करण्याची घोषणा आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.

या आंदोलकांना पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास तीन वेगवेगळ्या टप्प्यात गुजरात पोलिसांनी आसूड यात्रेतील आंदोलकांना महाराष्ट्रात आणून सोडले. मोदींच्या एकाधिकारशाहीचा आपण निषेध करतो आणि पुन्हा हे आंदोलन केले जाईल, अशी घोषणा आमदार बच्चू कडू यांनी पोलिसांनी सोडल्यानंतर केली. गुजरात पोलीस ज्या अमानुष पद्धतीने वागले त्या पद्धतीने आंदोलक वागले असते तर रक्तपात झाला असता. गुजरातमध्ये मोदींशिवाय कोणाचे काही चालणार नाही, अशी पोलिसांची दंडेलशाही असल्याचा आरोप त्यांनी केला.