बजाजने बजेटमधली बाईक आणली बाजारात

0

मुंबर्ई। बाईक उत्पादनात आघाडीच्या कंपनींपैकी एक असलेल्या बजाज कंपनीने आपली नवी बाईक सीटी 100 (बीएस4) लाँच केली असून सर्वात महत्वाचे म्हणजे ही बाईक तुमच्या बजेटमधली आहे. ही बाईक तीन वेगवेगळ्या प्रकारांत उपलब्ध असून बजाज सीटी 100 या बाईकची दिल्लीतील एक्स शोरूम किंमत 29 हजार 988 रुपयांपासून सुरु होत आहे. बजाजची ही बाईक स्टील व्हील ट्रिम, एलॉय व्हील आणि सीटी 100बी या तीन प्रकारांत लाँच करण्यात आली आहे.

35 हजार 389 रुपयांपासून सुरूवात
बजाज स्टील व्हील ट्रिमची किंमत 35 हजार 389 रुपये आहे, एलॉय व्हीलची किंमत 38,981 रुपये आणि सीटी 100 बीची किंमत 29 हजार 988 रुपये ठेवण्यात आली आहे. या किंमती दिल्लीतील एक्स शोरुममधील आहेत. बजाज सीटी 100मध्ये 10.5 लीटर क्षमतेची फ्यूअल टँक देण्यात आली आहे. तसेच यामध्ये ऑटोमॅटिक हेडलँप फिचरही देण्यात आला आहे. 3 इंच रुंद रियर टायरचा वापर करण्यात आला आहे. बजाज सीटी 100बी या बाईकमध्ये कंपनीने 99.27 सीसीचा सिंगल सिलिंडर एयर कूल्ड मिल कपल्ड इंजिन दिले आहे. हे इंजिन 7500 आरपीएमवर 8.2 पीएसच्या पॉवरवर 4500 आरपीएमवर 8.05 एनएमचा टार्क जनरेट करते.